कुठे इसिसशी संपर्क ठेवण्यावरून तात्काळ कारवाई करणारे ब्रिटन शासन, तर कुठे इसिसच्या संपर्कातील युवकांचे समुपदेशन करण्यासारख्या हास्यास्पद उपाययोजना राबवणारा भारत ! भारत शासन ब्रिटनकडून बोध घेईल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
लंडन : आतंकवादी संघटना इसिसला संपर्क केल्याच्या आरोपाखाली ब्रिटीश मॉडेल किंबर्ले मिनर्सला ७ ऑक्टोबरला रात्री पोलिसांनी अटक केली. मिनर्सवर अनेक दिवसांपासून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा एम्आय-५ लक्ष ठेवून होती. ब्रिटीश माध्यमांनुसार मिनर्सला ब्रिटीश गुप्तचर यंत्रणांनी संशयितांच्या सूचीमध्ये ठेवले होते. ब्रिटीश वृत्तपत्र द सन आणि संडे टाइम्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार मिनर्सने काही मासांपूर्वी इस्लामचा स्वीकार केला होता. यानंतर ती इसिस या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात आली होती. (इस्लामचा स्वीकार केल्यावर इसिसच्या संपर्कात येणे, ही गोष्ट संशय निर्माण करणारी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मिनर्स सामाजिक संकेतस्थळांवरूनही आतंकवादी संघटनेशी संबंधित लोकांशी संभाषण करत होती, तसेच ती ब्रिटनचे आतंकवादविरोधी पोलीस पथक आणि गुप्तचर यंत्रणा यांच्यावर लक्ष ठेवत होती.
पोलिसांनी इसिसशी संपर्कात न रहाण्याविषयी अनेक वेळा चेतावणी देऊनही वर्तनात सुधारणा न झाल्याने मिनर्सवर ही कारवाई करण्यात आली. (ब्रिटनचे पोलीस चेतावणी देऊन कारवाईही करतात, तर भारतीय पोलीस केवळ समुपदेशन करून आतंकवादाच्या समर्थकांना रान मोकळे सोडतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तिच्या घराचीही पडताळणी करण्यात आली. या वेळी पोलिसांना काय मिळाले, याची माहिती देण्यात आलेली नाही.
मागील मासात मिनर्सने सामाजिक संकेतस्थळांवर आयशा लॉरेन अल-ब्रिटानिया नावाने स्वतःचे खाते उघडले होते. मिनर्सने स्वतःची बुरख्यातील छायाचित्रे प्रसारित केली होती. तिने आतंकवाद्यांप्रमाणे हातात बंदुका अथवा इतर हत्यारे घेतलेल्या महिलांची छायाचित्रेही प्रसारित केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात