Menu Close

केरळमध्ये माकपच्या कार्यकर्त्याच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

केंद्र सरकारने केरळमधील भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी पाऊल उचलावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

20161013_mrकन्नूर (केरळ) – केरळच्या कन्नूर जिल्ह्यात १२ ऑक्टोबरला सकाळी भाजपच्या रेमित नावाच्या कार्यकर्त्याला फासावर लटकवून त्याची हत्या करण्यात आली. ११ ऑक्टोबरला सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपच्या) कार्यकर्ते के. मोहनन यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी माकपने भाजपवर आरोप केला होता. याच घटनेचा सूड म्हणून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. भाजपनेही रेमित यांच्या हत्येसाठी माकपला दोषी ठरवले आहे.

भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याने येथील परिस्थिती तणावग्रस्त बनली आहे. केरळमध्ये माकपचे सरकार सत्तेत आल्यापासून कन्नूर जिल्ह्यात ३०० हून अधिक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. (कम्युनिस्ट सत्तेत आल्यावर शांतता नव्हे, तर हिंसाचार होतो आणि हेच त्यांचे पुरोगामित्व ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *