भोर येथील दुर्गामाता दौडीमध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
भोर (जिल्हा पुणे) – विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन करायला हवा, असा संदेश हिंदूंना दिला आहे. सद्यस्थितीत हिंदु धर्मावर होणारे आघात परतवून लावण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. काश्मीरमधील हिंदू आपल्याच देशात निर्वासितांचे जिणे जगत आहेत. अशा परिस्थितीत काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी देशभरातील हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रा. श्रीकांत बोराटे यांनी केले. ते दसर्यानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीमध्ये बोलत होते. दौडीचा प्रारंभ भगव्या ध्वजाचे पूजन करून करण्यात आला. या वेळी शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री प्रा. अमर बुग्दुडे, गणेश कुंभार, राहुल शिंदे, पंकज आवाळे, धनंजय पवार, सोमनाथ ढवळे, तसेच समितीचे विश्वजीत चव्हाण यांसह १२५ हून अधिक धारकरी उपस्थित होते.
एक भारत अभियान-चलो कश्मीर की ओर या अभियानाच्या अंतर्गत २३ ऑक्टोबर या दिवशी पुणे येथील रमणबाग शाळेच्या पटांगणावर होणार्या धर्मसभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही प्रा. बोराटे यांनी केले.
क्षणचित्रे
१. दौडीमध्ये घोषणा देऊन हिंदु राष्ट्राचा जयघोष करण्यात आला.
२. शिवाजी पुतळा चौकात दौडीचे आगमन झाल्यावर उरी येथील आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
३. काश्मिरी हिंदूंसाठीच्या सभेचा विषय ऐकल्यानंतर आम्ही या सभेचा व्हॉटस् अॅपद्वारे प्रसार करू, असे धारकर्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले. (राष्ट्ररक्षणासाठी कृतीशील होऊ पहाणार्या धारकर्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात