पनवेल येथील ३ चित्रपटगृह व्यवस्थापकांकडे हिंदु जनजागृती समितीची मागणी
पनवेल – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील फन सिनेमा, पीव्हीआर् सिनेमा, मिराज सिनेमा येथील चित्रपटगृह व्यवस्थापकांना पाक कलाकारांचा समावेश असलेले रईस आणि ए दिल है मुश्किल हे चित्रपट प्रदर्शित करू नयेत. त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, असे निवेदन देण्यात आले. या वेळी निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते, तसेच धर्माभिमानी कु. अथर्व उपाध्ये, कु. कुणाल सावंत आणि कु. रूपेश किंद्रे उपस्थित होते. उरी येथील आक्रमणाच्या विरोधात ही निवेदने देण्यात आली. समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाला चित्रपटगृहांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पीव्हीआर् सिनेमा या चित्रपटगृहाने आगामी चित्रपटांच्या सूचीत वरील दोन्ही चित्रपटांची नावे आणि फलक लावले नाही. (अशा कृतीशील चित्रपटगृह व्यवस्थापकांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात