Menu Close

वाघोदा (जिल्हा जळगाव) येथे दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक

हिंदूंनो, किती काळ हिंदूंकडून मार खाणार आहात ? यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

२ हिंदू घायाळ, तक्रार नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ

वाघोदा (जिल्हा जळगाव) – येथे १२ ऑक्टोबरला रात्री १०.३० वाजता दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी जाणार्‍या हिंदूंना धर्मांधांनी शिवीगाळ केली, तसेच त्यांच्यावर दगडफेकही केली. (हिंदू संघटित नसल्याचाच हा परिणाम ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी २ हिंदूंच्या डोक्याला मार लागून ते घायाळ झाले.

या प्रकरणी हिंदू पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्यांनी ती नोंदवण्यास टाळाटाळ केली. (हिंदूंची तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस एकप्रकारे धर्मांधांना वाचवण्याचाच प्रयत्न करत आहेत. असे पोलीस हिंदु राष्ट्रात नसतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

तक्रार करण्यासाठी आलेल्या हिंदूंना पोलीस म्हणाले, तुम्ही तक्रार दिल्यास तुम्हाला सतत फेर्‍या माराव्या लागतील. तुम्हाला त्रास होईल. (हिंदूंचे रक्षण करण्याऐवजी उलट भीतीच दाखवणारे पोलीस हवेच कशाला ? हिंदूंनो, अशा पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार नोंदवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

याच्या निषेधार्थ वाघोदा येथील ग्रामस्थांच्या वतीने बंद पाळण्यात आला आहे. (हिंदूंनो, केवळ बंद पाळू नका, तर हिंदूंवर आक्रमणे होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सर्वांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. श्री गणेश चतुर्थीच्या काळातही त्याच परिसरात धर्मांधांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. (हिंदूंच्या उत्सवांमध्ये वारंवार अडथळे आणणार्‍या धर्मांधांवर शासन कठोर कारवाई करणार का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *