केंद्र सरकारने श्रीलंकेतील हिंदूंच्या रक्षणासाठी कृती करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
-
ख्रिस्ती मिशनर्यांचे खरे स्वरूप ओळखा !
-
आक्रमणामागे ख्रिस्ती मिशनर्यांचा हात !
कोलंबो – श्रीलंकेतील अनुराधापुरा या धर्मांधबहुल जिल्ह्यातील निरावी या गावी ख्रिस्ती, जिहादी आणि बौद्ध गुंडांनी ११ ऑक्टोबर या दसर्याच्या दिवशी शक्ती मंदिरात नवरात्रीचा उत्सव साजरा करणार्या हिंंदूंवर आक्रमण करून त्यांना मंदिरातून हुसकावून लावले. या धर्मांधांच्या तावडीत सापडलेल्या एका हिंदूला प्राणघातक शस्त्रांनी वार करून गंभीररित्या घायाळ करण्यात आले. ख्रिस्ती मिशनर्यांनी कट रचून हे आक्रमण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
१. निरावी या गावी आंध्रप्रदेशातील ३०० हिंदु कुटुंबे रहात आहेत. त्यांचा स्वच्छता करणार्या कामगारांत समावेश होतो. त्यातील २०० कुटुंबांचे ख्रिस्ती मिशनर्यांनी हळूहळू धर्मांतर केले. गावात एक चर्चही उभे राहिले आहे.
२. येथील ख्रिस्ती मिशनर्यांनी काही ख्रिस्ती, जिहादी आणि बौद्ध असणार्या भाडोत्री गुंडांना हाताशी धरून हिंदूंना धार्मिक विधी करण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर आक्रमण केले.
३. एका हिंदूने घाबरून मंदिराच्या गर्भगृहात आश्रय घेतला असता त्याला खेचून बाहेर काढले आणि त्याच्यावर अनेक वार केले. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात