कर्णावती – गुजरात गोसेवा विकास बोर्डाने महिलांना सूचना केली आहे की, त्यांनी गोयीचे दूध, तूप, मूत्र आणि शेण चेहर्यावर लावण्याचा प्रयोग करून पहावा. यामुळे चेहर्यावर चांगले परिणाम दिसून चेहरा सुंदर होतो. दूध १५ मिनिटे चेहर्यावर लावले पाहिजे. त्यानंतर तूप आणि हळद याने १५ मिनिटे मसाज करावा. त्यानंतर १५ मिनिटे गोमूत्र लावावे आणि फेसपॅक प्रमाणे शेण लावून शेवटी कडूलिंबाच्या पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे तोंडवळा मेकअपपेक्षा (सौंदर्यवर्धनापेक्षा) अधिक सुंदर दिसतो.
बोर्डाने पुढे म्हटले आहे की, देशातील सर्वांत सुंदर मानली जाणारी राणी क्लिओपात्रा दूधाने स्नान करत होती. बोर्डाकडून एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यात गोमूत्र, शेण, दूध यांमुळे विविध रोगही दूर होतात, असे म्हटले आहे. तसेच अमेरिका, रशिया आणि इटली येथील शास्त्रज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे, असे यात म्हटले आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात