रंगारेड्डी (आंध्रप्रदेश) – आज धर्मनिरपेक्षवादाच्या नावावर देशात सरकारकडून हिंदूंची मंदिरे कह्यात घेतली जात आहेत; परंतु मशिदींना कधी हातही लावला जात नाही. आता आमच्या समोर धर्मनिरपेक्ष राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?, असा प्रश्न नाही, तर इस्लामिक स्टेट कि हिंदु राष्ट्र ? असा प्रश्न आहे आणि याविषयी आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन जनार्दन यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तंदूर येथील एका नवरात्रोत्सवात हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि स्त्रीजागृती यांविषयी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. तेजस्वी, तेलगु देसम पक्षाचे श्री. राजू गौडा, श्री. रवि आणि विश्व हिंदु परिषदेचे श्री. दत्तात्रेय राव आदी उपस्थित होते.
या वेळी सौ. तेजस्वी म्हणाल्या, महिलांनी त्यांच्या रक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकले पाहिजे. शारीरिक, मानसिक बळासह आध्यात्मिक बळ असणारी स्त्री खरी रणरागिणी आहे. श्री. दत्तात्रेय राव म्हणाले, हिंदु धर्म महान आहे. भारतीय पंचांगात भविष्यातील कालमान अनेक वर्षांपूर्वीच लिहिले आहे. अशा महान धर्माचे आपण आचरण केले पाहिजे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात