बांगलादेशात एका हिंदु मंत्र्याकडूनच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यावर आक्रमण होणे, म्हणजे तेथे हिंदूंना कोणी वाली उरला नाही, हे स्पष्ट होते ! या हिंदूंकडे भारत सरकार लक्ष देईल का ?
बांगलादेशचे मंत्री नारायणचंद्र चंदा यांच्यावर आक्रमणाचा आरोप
ढाका – खुलना येथील मानवाधिकार कार्यकर्ते आणि बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे समन्वयक श्री. अमरेश गइन यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. त्यानंतर त्यांना खुलना येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हालवण्यात करण्यात आले. या आक्रमणामागे बांगलादेशचे मासेमारी आणि पशुखात्याचे मंत्री नारायणचंद्र चंदा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
१. या आक्रमणानंतर श्री. गइन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांनी दुमुरीया येथील पोलीस ठाण्यात जाऊन प्रथमदर्शी अहवाल (एफ्.आय.आर्.) प्रविष्ट करण्यासाठी प्रयत्न केला.
२. या घटनेत मंत्र्यांचा सहभाग असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे नाकारले.
३. बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. रवींद्र घोष यांनीही दुमुरीया येथील पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना योग्य कारवाई करण्याची विनंती केली; मात्र त्याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले.
४. त्यानंतर श्री. गइन यांनी खुलना येथील मुख्य न्यायदंडाधिकार्यांच्या न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. यावर न्यायालयाने पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले.
५. मंत्री चंदा यांनी पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवर दबाव आणून आक्रमणकर्त्यांना संरक्षण दिल्याचे समजते.
६. चंदा यांनी त्यांच्या कार्यकाळात हिंदूंसाठी काहीच केले नाही, अशा अनेक तक्रारी त्यांच्या विरुद्ध आल्या होत्या. या तक्रारींची मानवाधिकार कार्यकर्ते श्री. अमरेश गइन यांनी नोंद घेऊन जनआंदोलन उभारले होते.
७. बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने श्री. अमरेश गइन यांच्यावरील आक्रमणाचा निषेध केला असून गुन्हेगारांना त्वरित अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे, तसेच या प्रकरणात पोलीस आणि मंत्री चंदा यांच्या संशयास्पद भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी, असेही अधिवक्ता श्री. रवींद्र घोष यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात