पनवेल – विजयादशमीनिमित्त तरुणांमध्ये धर्माचे बळ निर्माण व्हावे; म्हणून येथील कळंबोली परिसरात श्री राम मंदिर समितीच्या वतीने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी कामोठे येथून निघालेली शिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांची दुर्गादौड कळंबोली येथे पोहोचली. श्री राम मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांनी दुर्गादौडीचे स्वागत केले आणि तेही त्यात सहभागी झाले. रणरागिणी शाखेच्या सौ. नंदिनी सुर्वे यांनी ध्वजाचे पूजन केले. श्रीराम मंदिरात शस्त्रपूजन करून मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली. हिंदु राष्ट्राच्या विजयाचा जयघोष करण्यात आला. रणरागिणी शाखेच्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या वेळी शिवप्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, महाराणा प्रताप बटालियन आणि रणरागिणी शाखा यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवकालीन मर्दानी खेळ लोकांना समजावेत, यासाठी प्रत्येक रविवारी सकाळी ९ वाजता डी.जी. तटकरे विद्यालय येथे तलवार प्रशिक्षणवर्गाचेही आयोजन करण्यात येते. ‘अधिकाधिक तरुणांनी या वर्गाला उपस्थित राहून प्रशिक्षण घ्यावे’, असे आवाहन करण्यात आले.
विशेष
रणरागिणीच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवतांना नऊवारी साडी परिधान केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात