Menu Close

नागपूर येथे विजयादशमीनिमित्त मंदिरांतून समाजाला शुभेच्छा आणि सोने वितरण !

nagpur_dasara_vitaran
मंदिरात विशेषांकाचे वितरण करतांना कार्यकर्ते

नागपूर : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ विविध भागांतील मंदिरांमधून समाजातील लोकांना विजयादशमीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी सोने (आपट्याची पाने) देऊन दैनिक सनातन प्रभातच्या ४२५ विशेषांकांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात २६ कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्थानिक मानेवाडा येथील श्री साईमंदिर, महाल येथील श्री गजानन महाराज मंदिर, प्रतापनगर येथील श्री दुर्गादेवी मंदिर आणि अजनी चौक येथील श्री हनुमान मंदिर येथे हा उपक्रम राबवण्यात आला.

या दिवशी सनातन संस्थेचे हितचिंतक, अर्पणदाते आणि विज्ञापनदाते श्री. राजेश मराठे, श्री. वामनराव जोशी, अधिवक्ता संदीप शास्त्री, अधिवक्ता भानुदास कुळकर्णी यांना तसेच मेडिकल प्रयोजनमचे डायरेक्टर श्री. शर्मा, पडगीलवार अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचे तुषार पडगीलवार, थ्री फेज इंजीनिअरींगचे श्री. नितीन नामजोशी आणि काकडे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे श्री. सुधाकर काकडे यांना व्यक्तीशः भेटून विजयादशमीनिमित्त शुभेच्छा, सोने आणि अंक देण्यात आले. भाजपचे नगरसेवक आणि मंदिरांचे विश्‍वस्त यांनाही शुभेच्छा अन् अंक देण्यात आले.

क्षणचित्र : या कार्यक्रमात साप्ताहिक सनातन प्रभातचे ३ वार्षिक वर्गणीदार सहभागी झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *