रावणाचे वंशज असल्याप्रमाणे रावणलीला करणार्यांवर कारवाई होण्यासाठी रामभक्तांनी सरकारवर दबाव निर्माण करावा !
हिंदुविरोधी राजकीय पक्षांवर बंदी घालण्याची शिवसेनेची मागणी !
चेन्नई – तमिळनाडूतील थंदै पेरीयार द्रविड कळघम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी १२ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता विजयादशमीच्या निमित्त रावणलीला साजरी करून कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीरामाच्या चित्राचे विडंबन करून ते चित्र जाळले.
या समाजकंटकांनी या अश्लाघ्य घटनेचे पूर्वनियोजन केले होते. या कार्यक्रमाची माहिती देणारे भित्तीफलक करणे, भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण करणे, पोलीस खाते आणि प्रसारमाध्यमे यांना पूर्वसूचना देणे इत्यादी कृती आधीच केली होती; मात्र प्रशासनाने आणि पोलिसांनी हा कार्यक्रम थांबवण्यासाठी कुठलीच कारवाई केली नाही. (अशा पोलिसांवर आणि प्रशासनातील संबंधितांवर कारवाई होण्यासाठी धर्माभिमान्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) उलट या कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी गोळा झालेल्या हिंदूंनांच पांगवण्यात आले. त्यांच्या ५ नेत्यांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. (तमिळनाडूत रावणराज्य आहे, हेच या घटनेतून दिसून येते ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
या कार्यक्रमात द्रविड कळघम पक्षाचे के. वीरमणी, थंदै पेरीयार द्रविड कळघम पक्षाचे कोवाई रामकृष्णन्, पेरीयार द्रविड कळघमचे कोलाथुर मानी आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा समावेश होता. या पक्षांच्या प्रकाशनांत नेहमीच हिंदूंच्या देवतांवर अश्लाघ्य भाषेत टीका करण्यात येते. (दैनिक सनातन प्रभातवर कारवाई करण्याची मागणी करणारे अशा प्रकाशनांच्या विरोधात कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
वरील सर्व माहितीसह तमिळनाडूतील शिवसेना राज्य अध्यक्ष श्री. जी. राधाकृष्णन् यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना १३ ऑक्टोबर या दिवशी एक पत्र पाठवून संबंधित राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रकाशनांवर बंदी घालून या पक्षाच्या नेत्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी केली आहे. (शिवसेना नेहमी हिंदूंसाठी कृती करत असल्याने हिंदूंना शिवसेनेचा नेहमीच आधार वाटतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात