गोतस्करीच्या विरोधात बौद्ध भिक्षूकडून पोलीस तक्रार
म्यानमारमध्ये बौद्ध भिक्षू गोरक्षण करतात, तसे भारतात किती हिंदू करतात ?
म्यानमार : मागील मासात बकरी ईदच्या वेळी ९० हून अधिक गायींची तस्करी केल्याप्रकरणी म्यानमारमध्ये ३ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पुढील सुनावणीपर्यंत सर्व संशयित आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी ३० संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
बकरी ईदनिमित्त होणार्या पशुहत्येच्या विरोधात तेथील अनेक बौद्ध भिक्षू सातत्याने आंदोलन करतात. गेल्या सप्टेंबर मासात अवैधपणे ९२ गायींची तस्करी करण्यात येत असल्याविषयी एका बौद्ध भिक्षूने पोलिसांकडे तक्रार केली होती. एएफपी या वृत्तसंस्थेने यातील दोन गायींचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. इतर ९० गायींना सध्या रंंगून येथील एका फुटबॉल मैदानात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी धर्मांधांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप येथील धर्मांध नेत्यांनी केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात