Menu Close

केवळ हिंदुद्वेषामुळे मला जातीय तणाव निर्माण करायचा होता ! – तक्रारदार वरुण कश्यप याची स्वीकृती

गायीच्या चामड्याची बॅग असल्याची दमदाटी करून खोटी पोलीस तक्रार केल्याचे प्रकरण

गोरक्षकांची अपकीर्ती करण्याचा होणारा प्रयत्न केंद्र सरकार लक्षात घेईल का ?

मुंबई : विज्ञापन क्षेत्रात काम करणार्‍या वरुण कश्यप या व्यक्तीने गेल्या ऑगस्ट मासात पोलिसात तक्रार करून त्याच्या जवळ असलेली बॅग गायीच्या चामड्याची असल्याचा आरोप करून त्याला इतरांनी दमदाटी केल्याची तक्रार प्रविष्ट केली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत वरील तक्रार खोटी असल्याचे आढळून आल्याने कश्यप यांना अटक करून त्याचा जबाब नोंदवला. त्यात कश्यप यांनी मी हिंदूंचा द्वेष करत असल्याने खोटे बोललो, मला जातीय तणाव निर्माण करायचा होता, अशी स्वीकृती दिली आहे.

१. वरुण कश्यप यांनी १९ ऑगस्ट या दिवशी अंधेरी येथील डी.एन्. नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती की, ते सकाळी ११ वाजता अंधेरी येथील घरातून कार्यालयात जाण्यास एका रिक्शात बसले. रिक्शाचालकाने कश्यप यांच्याजवळ असलेल्या बॅगेला वास येत आहे. त्यावरून ती गायीच्या चामड्याची आहे, असा आरोप केला. त्याने आणखी २ साथीदारांना बोलावून कश्यप यांना दमदाटी केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करून घेतला.

२. या घटनेने समाजात बरीच खळबळ माजली होती. गोरक्षकांवर मुसलमानांनी आणि पुरोगामी म्हणवून घेणार्‍या राजकीय पक्षांनी टीकेची राळ उडवली होती. पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेऊन कसून तपास केला असता कश्यप यांच्या तक्रारीत अनेक तफावती आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी कश्यपवरच खोटी तक्रार प्रविष्ट केल्याचा आरोप ठेवून त्यांना अटक केली.

३. या प्रकरणी कश्यप यांनी आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांचे साहाय्य घेतल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.

४. पोलिसांनी कश्यप यांच्या विरुद्ध २ जातींमध्ये वैमनस्य पसरवणे, खोटी तक्रार देऊन शासकीय कर्मचार्‍याचा दुरुपयोग करून घेणे इत्यादी कलमाखाली गुन्हा प्रविष्ट केला आहे. तसेच न्यायालयातही लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती दिली. कश्यपविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना ५ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *