पाकचे झेंडे फडवले जात असतांना त्यांच्यावर कारवाई न झाल्याचाच हा परिणाम आहे, आतातरी सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का ?
श्रीनगर : काश्मीरमध्ये शुक्रवार, १४ ऑक्टोबरला दंगलखोर धर्मांधांनी नमाजानंतर नेहमीप्रमाणे केलेल्या निदर्शनांच्या वेळी चीनचे झेंडे फडकवले. आतापर्यंत या धर्मांधांकडून पाकिस्तान, इसिस, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आदी आतंकवादी संघटनांचे झेंडे फडकवले जात होते. आता पहिल्यांदाच चीनचे झेंडे फडकवण्यात आले. चीनने आम्हाला साहाय्यता करावी, असे या झेंड्यांवर लिहिण्यात आले होते. ही घटना बारामुल्ला येथे घडली. या धर्मांधांनी या वेळी पाकचेही झेंडे फडकवले. या वेळी धर्मांधांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी या वेळी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत त्यांना पांगवले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे ब्रिक्स परिषदेसाठी भारत दौर्यावर आले असतांनाच काश्मीरमध्ये चीनचे झेंडे फडकावण्यात आले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात