Menu Close

दुर्गोत्सव मंडळांच्या वाद्यांवर पोलिसांनी बंदी घातल्याने कार्यकर्ते संतप्त !

अडावद (जिल्हा जळगाव) येथील श्री दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीतील प्रकार

अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी पोलीस अशी अडवणूक कधी करतात का ?

अडावद (जिल्हा जळगाव) : येथे १३ ऑक्टोबरला श्री दुर्गादेवीची मूर्तीविसर्जन मिरवणूक विलंबाने निघाल्याने पोलिसांनी नेहरू चौकातच रात्री ११.३० वाजता १५ मंडळांची वाद्ये बंद केली. (प्रत्येक वेळी हिंदूंच्याच उत्सवावर निर्बंध का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे मंडळांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांशी दीड घंटा वाद घातला. शेवटी १ वाजता मिरवणूक संपली.

१. मिरवणूक दुपारी २ वाजता निघणे अपेक्षित असतांना ती सायंकाळी ५ वाजता निघाली. मंडळांची संख्या अधिक असल्याने नियोजन करतांना पोलिसांची धावपळ झाली. त्यामुळे त्यांनी वाद्ये बंद करण्याचा निर्णय घेतला. (मंडळांची संख्या अधिक होती, तर पोलिसांनी आधीच सुनियोजन का केले नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. या सर्व दुर्गोत्सव मंडळांना आणि वाद्य वाजवणार्‍यांना १४९ प्रमाणे नोटीस देण्यात आल्या. (हिंदूंनो, तुमच्यावर अन्याय करणार्‍या पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

वृत्तपत्रस्वातंत्र्याची गळचेपी करणारे पोलीस कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ?

पोलिसांची पत्रकारांसमवेत अरेरावी !

नेहरू चौकात पत्रकारांशी पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या कार्यालयालयातील पोलीस हवालदार शिवाजी बाविस्कर, पोलीस वाहनाचा चालक तस्लिम खाँन यांनी पत्रकारांशी वाद घातला. पोलिसांनी पत्रकारांसमवेत अरेरावीची भाषा केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *