नवी देहली : काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांची न्यायिक लवादाद्वारे चौकशी व्हावी आणि विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये केंद्रशासित पनून कश्मीर हा स्वतंत्र भाग देण्यात यावा, या मागणीसाठी जंतर-मंतर येथे नुकतेच राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला.
वर्ष १९९० मध्ये काश्मीर खोर्यातील हिंदूंवर जिहादी आतंकवाद्यांकडून सहस्रो हिंदूंची हत्या करण्यात आली, सहस्रो महिलांवर बलात्कार करण्यात आले, तसेच घरे आणि संपत्ती बळकावून साडेचार लक्षाहून अधिक हिंदूंना काश्मीर खोर्यातून हाकलण्यात आले. या विस्थापित हिंदूंचे अद्याप पुनर्वसन झाले नसून अद्याप ते न्यायापासून वंचित आहेत. या घटनेला आता १९ जानेवारी २०१६ या दिवशी २५ वर्षे होत आहेत, तरीही या स्थितीत पालट झालेला नाही. त्यामुळे या हिंदूंसाठी स्वतंत्रपणे पनून काश्मीर नावाच्या केंद्रशासित भागाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
काश्मिरी हिंदूंची सद्यस्थिती
१. विस्थापित काश्मिरी हिंदू देशातील अनेक भागांत अत्यंत वाईट अवस्थेत रहात आहेत. या हिंदूंकडे कोणत्याही शासनाने आतापर्यंत लक्ष दिलेले नाही. अनेक ठिकाणी त्यांना दोन वेळचे अन्नही मिळणे दुरापास्त आहे.
२. आर्थिक अडचणींमुळे येथील युवक कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक, तसेच अन्य शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यामुळे या तरुणांना अक्षरश: मोलमजुरी करून जीवन कंठावे लागत आहे.
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनात लक्ष घालून जुलै मासात घोषित केलेल्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावरही अद्याप पुढे कोणतीच कृती झाल्याचे ऐकिवात नाही.
४. अन्य कौटुंबिक अडचणींमुळे काश्मिरींचा लोकसंख्या दर घटला आहे.
आंदोलनातील वक्त्यांचे उद्बोधक विचार
श्री. राजेश कौल, संघटनमंत्री, पनून कश्मीर
राजा हरीसिंह यांनी जेव्हा काश्मीरला भारतात सहभागी होण्यासाठी प्रस्ताव दिला होता, तेव्हा जुनागड, भाग्यनगर (हैद्राबाद) इत्यादी संस्थाने भारतात सहभागी झाली होती; परंतु काश्मीरला सहभागी करून घेण्यात आले नाही.
२. सुश्री नीलम दुबे, राष्ट्रीय प्रवक्त्या, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू आश्रम
पूर्वी एक पत्रकार म्हणून कार्यरत असातांना मला काश्मिरी हिंदूंची सद्यस्थिती बघायला मिळाली. आज आम्हाला हिंदु राष्ट्र आणण्यासाठी संघटित होऊन प्रयत्न करायला हवे.
३. श्री. सुरेश मुंजाल, हिंदु जनजागृती समिती, समन्वयक, पंजाब आणि हरियाणा
गुगलवर जर वंशविच्छेदचा शोध घेतला, तर यहूदींचा पूर्ण इतिहास आणि माहिती मिळते; मात्र काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाची एकही गोष्ट सापडत नाही.
क्षणचित्रे
१. या आंदोलनाच्या वेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
२. एक शासकीय सुरक्षा अधिकारी म्हणाले, अन्य संघटना केवळ खाण्या-पिण्यासाठी आंदोलने करतात; परंतु हिंदु जनजागृती समितीची आंदोलने अतिशय चांगल्या आणि शिस्तबद्ध स्वरूपात असतात. आंदोलनाच्या वेळी जी भाषणे देण्यात येतात, ती ऐकण्याची इच्छा होते.
३. जंतरमंतरवर एका दुसर्या संघटनेची सभा होती. पनून काश्मीरचे श्री. राजेश कौल यांनी सभेतील लोकांना राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा विषय सांगून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्वरीत ते या आंदोलनात सहभागी झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात