पुणे : काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणार्या एक भारत अभियानाला जाहीर पाठिंबा व्यक्त करत शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख श्री. विनायक निम्हण यांनी २३ ऑक्टोबरला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेस शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. शिवसेना काश्मिरी हिंदूंच्या सदैवी पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या पटांगणावर होणार्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र समन्वयक सर्वश्री सुनील घनवट, अमोल मेहता, कृष्णाजी पाटील आणि शशांक सोनवणे यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हासंघटक श्री. शाम देशपांडे हेही उपस्थित होते. श्री. देशपांडे यांचेही धर्मजागृती सभेस सहकार्य लाभत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
say no to casty sidramiya