Menu Close

केरळच्या कदवंथरा देवीच्या मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन

कोची (केरळ) : येथील कदवंथरा देवीच्या मंदिरात नवरात्रीच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्र आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व या विषयावर प्रवचन घेण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या कु. रश्मी परमेश्‍वरन् यांनी या वेळी मार्गदर्शन केले. कु. रश्मी परमेश्‍वरन् म्हणाल्या, महिलांमध्ये देवीतत्त्व असते आणि त्यांनी ते नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. या वेळी कु. परमेश्‍वरन् यांनी भारताच्या गौरवशाली परंपरेचे महत्त्वही विशद केले. या परंपरेचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य असल्याचे ही त्यांनी सांगितले. या वेळी ६० देवी भक्त उपस्थित होते. प्रवचनाला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद लाभला. मंदिरातील उत्सवाच्या वेळी असा कार्यक्रम पुन्हा आयोजित करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *