भाजप शासित मध्यप्रदेशातील पेटलावद येथे पोलिसांकडून भाजप आणि संघ कार्यकर्त्यांना मारहाण !
धार (मध्यप्रदेश) : धार जिल्ह्यातील पेटलावद येथे १२ ऑक्टोबरला मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी एका धर्मांधांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र या प्रकरणी पोलिसांनी भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या कार्यकर्त्यांना उत्तरदायी ठरवून त्यांना घरातून नेऊन मारहाण करण्याची आणि त्यांच्या सुटकेसाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या अन्य पदाधिकार्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
मोहरमच्या दिवशी धार जिल्ह्यातील झाबुआ, गंधवानी, देदला, पीपल्या, देवास आणि धामनोद या भागांत तणाव निर्माण झाला होता. येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या. १४ ऑक्टोबरला हिंदु जागरण मंचने येथील झाबुआ भागात बंद पुकारला होता. धार जिल्ह्यात एकूण ७० लोकांना कह्यात घेण्यात आले आहे. पीपल्या येथे मोहरमच्या वेळी दोन्ही गटांत झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ४ घरे, १२ हून अधिक दुचाकी वाहने, एक ट्रक आणि अन्य एक वाहन जाळण्यात आले. यात २० जण घायाळ झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात