Menu Close

चलो काश्मीरच्या नार्‍याने सिंहगड दुमदुमला… !

sinhagad_prasar
सिंहगडावर प्रसार करतांना कार्यकर्ते

पुणे : जिहादी आतंकवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंचे पुन्हा सन्मानाने काश्मीरमध्ये पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने येथील रमणबाग शाळेच्या पटांगणावर २३ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रसारासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत किल्ले सिंहगड येथे प्रसारमोहीम राबवली.

कार्यकर्त्यांनी गडावरील पर्यटकांना काश्मिरी हिंदूंवर ओढवलेली दुर्दैवी स्थिती अवगत करून त्यांच्या समर्थनासाठी संघटित होण्याचे आवाहन करत धर्मसभेचे निमंत्रण दिले.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत काश्मिरी हिंदूंसाठी धर्मसभेला उपस्थित रहाणार असल्याचे सांगत अनेकांनी सभेचा सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रसार करण्याची उत्स्फूर्त सिद्धता दर्शवली.

अनेकांनी हे कार्य अत्यंत आवश्यक असून या उपक्रमाचे कौतुक केले. पुष्कळ लोकांनी ०२०-४९१३१३१२ या क्रमांकावर त्वरित मिस्ड कॉल देऊन एक भारत अभियानात सहभाग नोंदवला. या प्रसंगी ५०० हून अधिक जणापर्यंत सभेचा विषय पोचवून २५० हून अधिक हस्तपत्रकांचे वाटप करण्यात आले. अनेकांनी फ्लेक्सचे छायाचित्रही काढून घेतले.

क्षणचित्रे 

१. धर्मसभेचा फ्लेक्स धरून समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. हा फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

२. हिंदुत्वनिष्ठ श्री. संतोष उनेछा हे समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रसारसेवेत सहभागी झाले होते.

३. गडावरील एका काकांनी सभेचा विषय जाणून घेऊन अन्य पर्यटकांनाही यासंदर्भात जाणून घेण्यास उद्युक्त केले.

४. गडावरील पर्यटकांनी समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषणांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून काश्मिरी बांधवांना पाठिंबा दर्शवला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *