Menu Close

कोजागरीच्या निमित्ताने राष्ट्रजागरण !

Hindu_dharmajagruti_sabhaपुणे : काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रसार करत समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रजागरण केले. कोजागरी पौर्णिमेच्या निमित्त सायंकाळी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून धर्मसभेची माहिती लोकांपर्यंत पोचवून धर्मसभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले.

१. नवयुग मित्रमंडळाच्या वतीने कोजागरीच्या कार्यक्रमातही विषय मांडण्यात आला. या प्रसंगी ३०० जण उपस्थित होते. या प्रसंगी सभेची हस्तपत्रकेही वितरित करण्यात आली.

२. गावठाण येथे शिवसेनेचे श्री. अजय भोसले यांच्या, तसेच श्रीरामनगर येथे, मेहुणपुरा नवरात्रोत्सव मंडळ येथे कोजागरीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांत उपस्थितांना धर्मसभेचे निमंत्रण देण्यात आले. नारदमंदिर येथील कार्यक्रमातही विषय मांडण्यात आला. नारदमंदिराचे श्री. येनपुरे यांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.

३. राष्ट्रीय कला अकादमीच्या कार्यक्रमात समितीचे श्री. अमोल मेहता यांनी सभेचा विषय सांगून निमंत्रण दिले. या वेळी राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने काश्मिरी बांधवांच्या समर्थनार्थ रांगोळी काढण्याची सिद्धता दर्शवली.

४. सांगवी येथील श्री. संजय शर्मा यांनी काश्मिरी हिंदूंसाठीच्या धर्मसभेचा विषय मित्रांपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले, तसेच धर्मसभेसाठी आर्थिक स्वरूपात साहाय्य केले.

५. भोसरीमधील केळगाव, तसेच गोगलेवाडी, हातवे आदी गावातील ग्रामस्थांनी गाड्या करून धर्मसभेला येण्याचे ठरवले.

६. रणरागिणी शाखेच्या कु. मोनिका गावडे यांनी शिवाजीनगर येथील न्यायालयात महिला अधिवक्त्यांसमोर विषय मांडला. स्त्री-शक्ती जागर महिला बचत गटामध्येही महिलांना धर्मसभेची माहिती सांगून निमंत्रण देण्यात आले. स्वाध्याय परिवाराच्या सौ. साठे यांनी परिचितांना देण्यासाठी स्वतःहून सभेची काही हस्तपत्रके मागून घेतली.

७. भोसरी येथील रिक्शास्थानकावरील रिक्शांवर सभेची हस्तपत्रके लावण्यात आली. या वेळी श्री. निघोट यांनी स्वतः ५० रिक्शांवर पत्रके लावण्यात साहाय्य करणार असल्याचे सांगितले.

८. चौकाचौकांमध्ये कोपराबैठका घेऊन धर्मसभेचा प्रसार करण्यात येत आहे.

धर्मसभेसाठी गावदेवीला प्रार्थना करतो ! – गजानन भगवान, पुजारी

धर्मसभेच्या प्रसारासाठी कोंढणपूर येथे घेतलेल्या कोपरा बैठकीला उपस्थित असणारे पुजारी श्री. गजानन भगवान यांनी उत्स्फूर्तपणे काकड आरतीच्या वेळी धर्मसभेसाठी गावदेवीला प्रार्थना करतो, असे सांगितले. (कोणत्याही कार्याच्या पूर्ततेसाठी आध्यात्मिक अधिष्ठानाची आवश्यकता असते. ती जाणून धर्मसभेसाठी देवाला साकडे घालणार्‍या श्री. गजानन भगवान यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

धर्मसभेच्या प्रसारात सक्रिय सहभागी होणार्‍या दुर्गावाहिनीच्या सौ. सरिता अंबिके !

काश्मिरी बांधवांसाठीच्या धर्मसभेविषयी अवगत केल्यानंतर दुर्गावाहिनीच्या सौ. सरिता अंबिके यांनी सभेच्या प्रसारकार्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. १५ ऑक्टोबर या दिवशी त्या समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रसारसेवेत दिवसभर सहभागी झाल्या होत्या. एवढेच नाही, तर त्यांनी ५० महिला संघटना आणि बचत गट यांचे संपर्क देऊन पुढाकार घेऊन काही बैठकांचेही आयोजन केले. (झोकून देऊन धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य करणार्‍या सौ. सरिता अंबिके यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *