- हिंदु सहिष्णु असल्यामुळे त्यांच्या धार्मिक मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण होऊनही ते शांत रहातात !
- हिंदूंनी त्यांच्या धार्मिक मिरवणुकीचे पोलीस रक्षण करू शकत नसल्याने मिरवणूक काढतांना सुरक्षेच्या उपाययोजनाही केल्या पाहिजेत !
पाटलीपुत्र (पाटणा) : बिहार राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीवर मोहरमच्या मिरवणुकीतील धर्मांधांनी आक्रमण केल्याने जातीय तणाव निर्माण झाला आहे, असे पोलिसांच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. या घटनांत पोलिसांसह ८ जण घायाळ झाले. या दंगलींमुळे गोपालगंज, भोजपूर, मधुबनी, पूर्व चम्पारण, मधेपुरा आणि किशनगंज या जिल्ह्यांतील जनजीवनावर परिणाम झाला. वरील सर्व जिल्ह्यांत कलम १४४ नुसार जमावबंदीचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी ५२ जणांना अटक करण्यात आली.
१. गोपालगंज येथे दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. ५ दुचाकी आणि २ चारचाकी वाहनांसह १० वाहनांना आग लावण्यात आली, तसेच अनेक हिंदूंच्या दुकानांची हानी करण्यात आली.
२. भोजपुरच्या पिरो शहरात गेले ४ दिवस जातीय तणावाचे वातावरण कायम आहे. जिल्हाधिकारी बिरेंद्रप्रसाद यादव यांनी शहरात अफवा पसरू नये यासाठी इंटरनेट सेवा स्थगित केली. येथून जाणार्या ३ प्रवासी रेल्वे गाड्या रहित करण्यात आल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात