Menu Close

गंधवानी (मध्यप्रदेश) येथे २०० धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

आक्रमणाला विरोध करणार्‍या हिंदूंवर सशस्त्र आक्रमण

  • २ हिंदूंची प्रकृती गंभीर

  • देवीचे यज्ञकुंड लाथांनी तोडले !

हिंदू असंघटित असल्यामुळेच त्यांच्यावर पुनःपुन्हा धर्मांधांकडून मार खाण्याची वेळ येते !

गंधवानी (मध्यप्रदेश) : येथील आवळीपुरा भागात २०० धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. (भाजप शासित मध्यप्रदेशचे इस्लामिस्तान झाले, असे समजायचे का ? राज्यात हिंदूंना अभय देण्यासाठी आणि धर्मांधांवर वचक बसण्यासाठी भाजप शासन काय पावले उचलणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यांनी देवीचे पूजन करण्यासाठी बनवण्यात आलेले जळते यज्ञकुंड लाथा मारून तोडले. (असे धर्मांध हे आधुनिक गझनीच होत ! भारतात कुठेही धर्मांध कायदा हातात घेण्याचे दुःसाहस करतात, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी त्यांना वारंवार डोक्यावर घेतल्याचे फलित ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

याला विरोध केल्यावर त्यांनी हिंदूंवर सशस्त्र आक्रमण केले, तसेच दगडफेकही केली. या वेळी अनेक हिंदू घायाळ झाले. धर्मांधांनी नितेश बैरागी आणि राजू गोविंद सीरवी यांना घेरून त्यांच्यावर तलवारीने वार केले. नितेश बैरागी या तरुणाचा हात मनगटापासून तोडला, तर राजू सीरवी गंभीर घायाळ झाला आहे. दोघांचीही स्थिती गंभीर आहे. धर्मांधाने एका पोलिसावरही आक्रमण करून त्याला गंभीर घायाळ केले आहे. (धर्मांधांकडून मार खाणारे पोलीस आतंकवाद्यांपासून समाजाचे रक्षण काय करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

अखलाख याच्या हत्येनंतर उर बडवणारी प्रसारमाध्यमे या वृत्ताला प्रसिद्धी देणार नाहीत, तसेच पुरस्कार वापसी करणारी टोळीही काही कृती करणार नाही, हे लक्षात घ्या ! हिंदूंचे संघटन, हेच सर्व समस्यांवर उत्तर होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *