Menu Close

धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसारखे कार्य कोणी करत नाही ! – श्री. राम गावडे, पुणे जिल्हाप्रमुख, शिवसेना

shivsena
डावीकडून खासदार श्री. शिवाजीराव आढळराव-पाटील यांना धर्मजागृती सभेचे निमंत्रण देतांना समितीचे श्री. दिलीप शेटे आणि त्यांच्या उजव्या बाजूला श्री. राम गावडे

पुणे : धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसारखे कार्य कोणी करत नाही. सध्या अनेक संघटना या फक्त बोलतात; पण कृती मात्र तुम्हीच करता. तुमचे कार्य अप्रतिम आहे. तसेच काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येत असलेल्या एक भारत अभियानाला शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख म्हणून आमचा जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख श्री. राम गावडे यांनी केले. या वेळी त्यांनी २३ ऑक्टोबरला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेस शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले.

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या पटांगणावर होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण खासदार श्री. शिवाजीराव आढळराव-पाटील आणि श्री. राम गावडे यांना देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री किरण शेटे, किरण दारोळे, मनोज शिंदे आणि निखील पोखरकर यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी श्री. गावडे बोलत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *