Menu Close

बेळगाव : महानगरपालिकेकडून भगव्या पताका आणि ध्वज काढण्याची मोहीम !

महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वाद

भगव्याद्वेषाची कावीळ झालेले बेळगाव महानगरपालिका प्रशासन !

belgaon_dhwaj
भगवा ध्वज काढतांना महापालिकेचे कर्मचारी

बेळगाव : चव्हाट गल्ली येथे ध्वज आणि पताका लावण्यावरून निर्माण झालेल्या दंगलीमुळे पोलीस प्रशासनाने उपाययोजना म्हणून महापालिकेच्या वतीने १३ ऑक्टोबरपासून शहर आणि उपनगर परिसरातील भगव्या पताका आणि ध्वज हटवण्याची कारवाई केली; मात्र या कारवाईस आनंदनगर, वडगाव येथे विरोध झाल्याने मोहीम थांबवावी लागली. दसरा आणि श्री दुर्गामाता दौड यांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील प्रत्येक रस्त्यावर भगव्या पताका आणि भगवे ध्वज लावण्यात आले होते; मात्र महापालिकेच्या अधिकार्‍यांनी पताका हटवण्याची मोहीम हाती घेतली.

(बेळगाव येथे धर्मांधांनी अनेकवेळा दंगल घडवल्याचे स्पष्ट असतांनाही त्यांच्यावर कारवाई न करता भगवे पताके आणि ध्वज हटवण्याची कारवाई करणारे महापालिका प्रशासन भ्याड आणि हिंदुद्वेषी आहे. हिंदूंनो, यासाठी संघटित होऊन महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात न्याय मिळेपर्यंत वैध मार्गाने लढा दिला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *