Menu Close

देवनार पशूवधगृहासाठी देण्यात येणार्‍या १ सहस्र ६६ कोटी रुपये अनुदानाच्या निषेधार्थ अखंड हिंद पार्टीचे आंदोलन !

वारंवार अशी आंदोलने करावी लागू नयेत, यासाठी हिंदु राष्ट्र स्थापा !

मुंबई : देवनार पशूवधगृहासाठी १ सहस्र ६६ कोटी रुपये अनुदान देणार्‍या मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाचा निषेध म्हणून येथील आझाद मैदानात अखंड हिंद पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अनुदान रहित न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. त्यातून होणार्‍या परिणामांना शासन आणि मुंबई महानगरपालिका कारणीभूत असेल, अशी चेतावणी यावेळी देण्यात आली.

१. देवनार पशूवधगृहामुळे जलप्रदूषण आणि वायूप्रदूषण होत असल्याचे ठाऊक असूनही महानगरपालिकेने असा निर्णय घेणे म्हणजे जनतेचे आरोग्य धोक्यात घालण्यासारखे आहे. अल्पसंख्यांकांच्या मतांचे राजकारण म्हणून हे स्वार्थी राजकारणी कोट्यवधी रुपयांचे अनुदान देत आहेत, हे निंदनीय आहे.

२. आंदोलनाला अखंड हिंद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. हितेंद्र ठाकूर, अखंड हिंद पार्टीचे आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष जगद्गुरु श्री कृष्णदेवनंद गिरीजी द्वारकावाले, पार्टीचे राष्ट्रीय गोरक्षा प्रमुख श्री. प्रदीप पांडे, जीवदया प्रेमी जैन संत गणिवर्य श्री नयद्यासागर महाराज, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. सी.डी. सिंह, जयप्रकाश उपाध्याय, संजय पटेल, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक गुप्ता, प्रदेश महासचिव मधुकर थोरात, मुंबई उपाध्यक्ष ओमप्रकाश सोनार यांच्यासमवेत पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *