Menu Close

ठाणे पोलिसांकडून देवतांची चित्रे असलेल्या आणि अधिक आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी

हा निर्णय स्तुत्य असला, तरी त्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

firecrackersठाणे : दिवाळीत उडवण्यात येणार्‍या फटाक्यांमध्ये देवतांची चित्रे असलेले आणि १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे फटाके विक्री करणारे, तसेच ते उडवणारे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत ठाणे पोलिसांनी दिले आहेत. तसेच अशा फटाक्यांच्या विक्रीवरही मनाई  आदेश लागू केले आहेत.

२५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत कोणत्याही व्यक्तीस त्रास अथवा हानी होईल, अशा प्रकारे कोणत्याही रस्त्यात किंवा इमारतीपासून ५० फुटांच्या आत फटाक्यांचे प्रदर्शन भरवणे अथवा वाजवणे यांवर बंदी घातली आहे. या आदेशांचे उल्लघंन करणार्‍यास ८ दिवसांचा तुरुंगवास अथवा १ सहस्र २५० रुपये इतका दंड अथवा संबंधित व्यक्ती दोन्ही शिक्षेस पात्र राहील, असे ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था फटाक्यांच्या वेष्टनावरील देवतांच्या चित्रांच्या विडंबनाच्या विरोधात गेली काही वर्षे चळवळ राबवत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *