अश्लील छायाचित्रे पसरवण्याची धमकी देऊन मागितले १० लाख रुपये !
हिंदु तरुणींनो, लव्ह जिहादच्या धोक्यापासून सावध व्हा !
नोएडा : येथे यासिर या धर्माधाने हिंदु नाव धारण करून हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेने विमानाच्या तिकिटासाठी त्याच्याकडे वैयक्तिक माहिती मागितल्यावर त्याचे खरे स्वरूप उघड झाले; परंतु पीडितेची अश्लील छायाचित्रे पसरवण्याची धमकी देऊन त्याने युवतीला फसवले आणि तिच्याकडून ५ लाख रुपये उकळले; परंतु त्याने अधिक पैशांची मागणी केल्यामुळे पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडितेने मानहानीपोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी यासिरला सोडून दिले.
१. सायबर गुन्हे अन्वेषण केंद्रानुसार येथील फेस-२ येथे रहाणारा यासिर स्थानिक टेक्स्टाईल कंपनीत टेलर आहे. यासिरने स्वत:चे नाव राहुल सांगून फेसबुक च्या माध्यमातून नागपूर येथील एका युवतीशी मैत्री केली.
२. त्यांच्यात प्रेम निर्माण झाल्यानंतर काही दिवसांनी पीडितेने यासिरला उपाख्य राहुलला व्हाट्अपवरून तिची अश्लिल छायाचित्रे पाठवली.
३. काही दिवसांनंतर पीडितेने यासिरला नागपूर येथे बोलावले.
४. तेव्हा नासिर उपाख्य राहुल याने नागपूर येथे येण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे पीडितेन त्याचे विमान तिकीट काढण्यासाठी त्याचे नाव, पत्ता आदी तपशील मागितला.
५. त्यानंतर धर्मांधाने त्याचे खरे नाव सांगितले आणि धर्म लपवून पीडितेशी मैत्री केल्याचे मान्य केले. त्यानंतर पीडितेने मैत्री तोडण्यास सांगितले.
६. यासिरने पीडितेला तिची अश्लिल चित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली आणि १० लाख रुपयांची मागणी केली.
७. समाजाच्या भीतीने पीडितेने स्वत:जवळील सोने विकून ५ लाख रुपये त्याच्या खात्यात जमा केले; परंतु त्याने अधिक रकमेची मागणी केली. त्यानंतर तिने महिला मित्राच्या साहाय्याने सायबर शाखेत तक्रार दाखल केली.
८. पोलिसांनी यासिरला चौकशीसाठी बोलावले. तेव्हा त्याने पोलीस आणि पीडिता यांची क्षमा मागितली. पीडितेच्या खात्यावर पैसे परत केले, तसेच तिची अश्लिल छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफिती नष्ट केल्या. समाजाच्या भीतीने पीडिता तक्रार दाखल करण्यास सिद्ध नव्हती. त्यामुळे यासिरला सोडून देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात