एकच ध्येय, एकच वचन ! काश्मीरमध्ये हवे हिंदूंचे सन्मानाने पुनर्वसन !!
पुणे : आम्ही काश्मिरी हिंदूंच्या समवेत आहोतच, काश्मीरमध्ये हिंदूंचे सन्मानाने पुनर्वसन झालेच पाहिजे, राष्ट्रकार्यात आम्ही सदैव सोबत आहोत, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराच्या कालावधीत अनुभवायला मिळत आहेत. काश्मिरी हिंदूंप्रती नागरिकांमध्ये असलेला जिव्हाळा पाहून काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी जणू संपूर्ण पुणे शहरच उभे ठाकले असल्याचे वातावरण शहर आणि परिसरात निर्माण झाले आहे. येथील रमणबाग शाळेच्या पटांगणावर २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पनून कश्मीर, हिंदु जनजागृती समिती, काश्मिरी हिंदु सभा, लष्कर-ए-हिंद आणि हिंदु एकता आंदोलन पक्ष यांच्या वतीने विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या प्रसारासाठी समितीचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते यांच्यासह खानावळी, अधिकोष, वसतीगृहे, उपहारगृहे, महाविद्यालये आदी ठिकाणी धर्मजागृती सभेचा प्रसार करत आहेत.
पुणे शहराव्यतिरिक्त जवळपासच्या ४० हून अधिक गावांमध्ये धर्मसभेचा प्रसार करण्यात येत आहे. कोपरासभा, वैयक्तिक संपर्क, तसेच सोशल मिडिया आदी माध्यमातून सभेचा विषय लोकांपर्यंत पोेचवण्यात येत आहे. प्रसारादरम्यान सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या कार्यात सहभागी होण्यासाठी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे, तर सभेतील सहभाग निश्चित करण्यासाठी ०२०-४९१३१३१२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रसाराच्या कालावधीतील वैशिष्ट्यपूर्ण घटना
१. भाजप ओबीसी मोर्च्याचे पुणे शहराध्यक्ष श्री. अशोक मुंडे, भाजपचे श्री. योगेश गोगावले, भाजपचे संस्कृती विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. रामदास हरगुडे पाटील आणि श्री. स्वप्नील देवकर यांनी धर्मसभेला जाहीर पाठिंबा दर्शवत सभेसाठी सर्व कार्यकर्त्यांसमवेत उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले. महापौर प्रशांत जगताप यांनाही सभेचे निमंत्रण देण्यात आले.
२. फेसबूकच्या माध्यमातून आतापर्यंत १ कोटी ३६ लक्ष ५७ सहस्र लोकांपर्यंत सभेचा प्रसार करण्यात आला असून व्हॉट्स अॅप आणि ट्विटर या माध्यमातूनही ५५ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत सभेच्या पोस्ट पोेचवण्यात आल्या आहेत.
३. समितीचे कार्यकर्ते गावठाण भागातील बालाजी मंदिर येथे गेले असता मंदिराच्या पुजार्यांनी धर्मसभेचा प्रसार चांगला व्हावा, म्हणून कार्यकर्त्यांना प्रसाद दिला, तसेच देवाच्या चरणांवरील फुलेही प्रसाद म्हणून दिली. त्यांच्याकडे असणारे एक विशिष्ट प्रकारचे भांडेही कपाळाला लावले.
४. गोविज्ञान संशोधन समितीचे श्री. अनिल जोशी यांनी सभेचा व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून प्रसार करून १३० जणांचे सभेला येणे निश्चित केले आहे.
५. सिंहगड रस्ता येथे प्रसार करत असतांना श्री. गणेश सातपे यांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली, तसेच कार्यालयीन कामाव्यतिरिक्तचा वेळ धर्मसभेच्या सेवेसाठी वापरणार असल्याचे त्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले.
६. सिंहगड रस्ता येथील रिक्शाचालकांचा रिक्शांवर भित्तीपत्रके लावण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग होता. रिक्शाचालक, तसेच दुकानदार यांनी भित्तीपत्रके आपणहून मागून लावली.
७. कसबा पेठ येथील एका लाँड्रीचे मालक श्री. नीलेश राऊत यांनी सभेचा विषय ऐकून त्यांच्या नेहरू तरुण मित्रमंडळामध्ये बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात