Menu Close

शिग्ली (कर्नाटक) येथील धर्मसभेत पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा छळ !

देशात आतंकवाद्यांनी उच्छाद मांडला असतांना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणार्‍या संघटनेच्या कार्यात अडथळा निर्माण करणारे पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

police_chaukashiशिग्ली (कर्नाटक) : येथे २ ऑक्टोबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्यात आला, तसेच त्यांच्याकडून अयोग्य वर्तन करण्यात आले. (पोलिसांनी हिच शक्ती आतंकवाद्यांना पकडण्यासाठी वापरली असती, तर देश आतंकवादमुक्त होण्यास साहाय्य झाले असते – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. पोलिसांनी सभेच्या आदल्या दिवशी समितीच्या कार्यकर्त्यांना अनेक वेळा दूरभाष करून सभेच्या वक्त्यांच्या नावांची विचारणा केली.

२. सभेच्या प्रारंभी सूत्रसंचालक व्यासपिठावरून बोलत असतांना हरित क्रांतीविषयी का बोलत आहात ? उगीच विनाकारण अन्य धर्मिंयांविषयी बोलून वातावरण बिघडवत आहात, असे एक पोलीस एका कार्यकर्त्याला सांगत होते. (धर्मांधांच्या सभांमध्ये जाऊन त्यांनी काय बोलावे अथवा बोलू नये, असा फुकाचा सल्ला पोलीस त्यांना देतात का ? हिंदु धर्मजागृती सभांमध्ये सत्य स्थिती सांगून हिंदूंचे प्रबोधन केले जाते. हे सत्य सांगण्यास पोलीस आडकाठी करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. सभेला प्रारंभ झाल्यावर पोलीस सभेचे चित्रीकरण करत होते, तसेच कारण नसतांनाही मोठ्याने बोलत होते.

४. पोलीस एका साधकाविषयी खोटी माहिती देऊन धर्माभिमान्यांच्या मनात विकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे संबंधित साधकाला सेवा करण्यात अडचण येत होती.

५. स्वागतकक्षाजवळ पोलीस घोळक्याने थांबून बोलत असल्याने साधकांना सेवेत अडचणी येत होत्या. (जनतेच्या रक्षणासाठी असलेले पोलीस अशा पद्धतीने वेळ घालवत असतील, तर ती जनतेच्या धनाची उधळपट्टी नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *