या विद्यालयाचा आदर्श देशातील इतर विद्यालयांनी घेतल्यास मुलांवर चांगले संस्कार होण्यास साहाय्य होईल !
तिरुवनंतपुरम् (केरळ) : मुलांनी सकाळी शाळेत आल्यावर शिक्षक आणि वरिष्ठ कर्मचारी यांना अभिवादन करतांना गुड मॉर्निंग ऐवजी हरि ओम म्हटले पाहिजे, असा नियम येथील चिन्मया विद्यालयात करण्यात आला आहे. इंडिया टूडेनुसार शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा शर्मा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, ही चिंन्मया संस्कृतीचा एक भाग आहे. या नियमांचे विद्यार्थी पालन करतील, अशी आशा आहे. याविषयी संकेतस्थळावर म्हटल्याप्रमाणे हा नियम पालन करण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला आग्रह करण्यात आलेला नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात