निखिल वागळे यांच्या महाराष्ट्र १ या वाहिनीवरील चर्चासत्र आणि त्यात मांडलेल्या सूत्रांविषयी सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा खुलासा !
मुंबई : महाराष्ट्र १ वाहिनीवर सोमवार, १८.१०.२०१६ या दिवशी आजचा सवाल कार्यक्रमातील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील चर्चेच्या वेळी श्री. निखिल वागळे यांनी चर्चेतून माझा सहभाग वगळला आणि मला अपमानास्पद वर्तणूक देत माझ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. निखिल वागळे यांच्या आक्रस्ताळेपणाविषयी संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो, त्यामुळे त्यांच्याकडून सौजन्याची अपेक्षा करणेही चुकीचे आहे. या कारणाने त्यांनी आक्रस्ताळेपणा करून मांडलेल्या सूत्रांविषयी खुलाशाची खरे तर आवश्यकताच नाही; मात्र मी मांडलेल्या सूत्रांची सत्यता महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांना कळावी आणि वागळे यांच्यासारखे पत्रकार पुरोगामीपणाच्या आड लबाड्या करून जनतेपासून सत्य कसे लपवून ठेवतात, हे कळावे, यासाठी स्पष्ट आणि रोखठोक मत येथे मांडत आहे, असा खुलासा सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
श्री. वर्तक यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
१. १२.८.२०१२ या दिवशी आझाद मैदानात जी भीषण दंगल धर्मांधांनी केली, त्याची प्रेरणा बांगलादेश आणि ब्रह्मदेशातील धर्मांध बांधवांच्या कळवळ्याची अन् राष्ट्रद्रोहाची होती.
२. ही मंडळी काही देशप्रेम व्यक्त करण्यासाठी जमलेली नव्हती. त्या वेळी धर्मांधांनी नियोजनबद्धरित्या महाराष्ट्राच्या राजधानीतच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धर्मांधांनी पत्रकार आणि प्रसारमाध्यमे यांवर आक्रमण, वाहनांची जाळपोळ, महिला पोलिसांची विटंबना, अमर-जवान ज्योतीची मोडतोड केली. अशा कृत्यांत सहभागी होणार्या राष्ट्रद्रोह्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करून रोखायला हवे होते, हे माझे स्पष्ट मत आहे.
३. तत्कालीन शासनाने हे टाळले. इतकेच नव्हे, तर रमजान ईदचा सण आठवड्यावर येऊन ठेपल्यामुळे या देशद्रोह्यांना सात दिवस अटक करणार नाही, अशी भूमिका तत्कालीन सत्ताधारी पक्षाने घेतली आणि मुसलमान धर्मसत्तेपुढे राजसत्तेने मान झुकवल्याचे लाजीरवाणे दृश्य निर्माण झाले होते.
४. महाराष्ट्र पोलीसदलातील कनिष्ठ महिला कर्मचारी मराठमोळ्या आहेत, हे शंभर टक्के सत्य निखील वागळेंसकट प्रत्येकाला ठाऊक आहे. त्यांच्यावर अत्याचार करणारे धर्मांध जिहादी होते, हेही सर्वज्ञात सत्य आहे. त्यामुळे कोपर्डीसारख्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर या बाबींचा उल्लेख मुळीच गैर नाही. उलट निखिल वागळेंसारख्या भेकड पत्रकाराने गेली चार वर्षे या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे, तसेच कोणतीही चर्चा आयोजित न केल्यामुळे त्यांच्या निर्भीडपणाचे(?) बिंग माझ्याकडून फुटल्याच्या संतापातून वागळे यांनी थयथयाट केला. वागळे यांनी कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलगी आणि आरोपी यांच्या जातीचा थेट उल्लेख चर्चेत यापूर्वी केला आहे. आझाद मैदान दंग्याबाबत त्यांनी वेगळी भूमिका का घ्यावी, याचे उत्तर त्यांनीच महाराष्ट्राला दिले पाहिजे.
५. सदर महिला पोलिसांची नावे जाहीर न करता त्यांनी तपासाच्या वेळी दिलेले जबाब एखाद्या जाहीर कार्यक्रमात वागळे यांनी स्वत: वाचून दाखवावेत आणि हा विषय एकदाही चर्चेत न घेण्याइतका त्यांना क्षुल्लक का वाटला, हे स्पष्ट करावे, असे माझे त्यांना जाहीर आव्हान आहे. या महिलांचे जबाब वाचल्यास कोणाही मराठी माणसाचे रक्त खवळेल, याची मला खात्री आहे. वागळे यांचे रक्त का खवळले नाही आणि ते एवढे निर्ढावलेले अन् निगरगट्ट कसे बनले, याचा जाब जनतेने त्यांना विचारला पाहिजे.
६. पोलिसांकडून माझ्याकडे विचारणा झाल्यास ही कागदपत्रे मी सादर करणारच आहे. आता समाजाकडूनच वागळे यांच्याकडे तुम्ही तुमची एकांगी फॅसिस्ट मनोवृत्ती कधी सोडणार ? अशी विचारणा होणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात