ठाणे पोलिसांनी देवतांची चित्रे असलेल्या आणि अधिक आवाज असणार्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातल्याचे प्रकरण हिंदु जनजागृती समितीच्या चळवळीला यश !
ठाणे : ठाणे पोलिसांनी देवतांची चित्रे असलेल्या आणि अधिक आवाज असणार्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली असून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन ठाणे पोलीस आयुक्त श्री. परमबीर सिंह यांनी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या शिष्टमंडळाला दिले.
पोलीस आयुक्त श्री. परमबीर सिंह म्हणाले, असे फटाके विक्री करतांना आढळल्यास आम्ही कारवाई करणार आहोत, तसेच तुम्हाला आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा १०० नंबरच्या हेल्पलाईनवर कळवावे. या वेळी निवेदन देतांना शिष्टमंडळात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन, रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता पाटील, सनातन संस्थेच्या सौ. चांगण, धर्माभिमानी महिला सौ. श्रद्धा कपाडी आणि सौ. सीमा कपाडी उपस्थित होत्या.
मानपाडा (डोंबिवली) येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन !
डोंबिवली : मानपाडा येथील पोलीस स्थानकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन काब्दुले यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदी भाषा जनता परिषदेचे श्री. हरिशंकर पाण्डेय, धर्माभिमानी श्री. शुभम् मिश्रा, श्री. विमलेश पाण्डेय, श्री. प्रमोद सिंह आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी एक पोलीस अधिकारी म्हणाले, “हिंदु जनजागृती समितीचे कार्य स्तुत्य आहे.”
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात