Menu Close

विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सरकारने त्वरित निर्णय घ्यावा !

पिरंगुटच्या (जिल्हा पुणे) ग्रामसभेतील ठराव

pune_sabha_prasar1
पिरंगुट : ग्रामसभेत काश्मिरी हिंदूंविषयीचे वास्तव अवगत करतांना श्री. दीपक आगवणे (उभे असलेले)

पिरंगुट (जिल्हा पुणे) : काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन करणे ही काळाची आवश्यकता आहे. त्यामुळे विस्थापितांचे जीवन जगत असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, असा ठराव पिरंगुटच्या ग्रामसभेचे एकमताने संमत केला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे यांनी पिरंगुटच्या ग्रामसभेत काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेविषयी ग्रामस्थांना अवगत केले होते. त्यानंतर सरपंच सौ. ललिता पवळे यांच्या अध्यक्षतेखाली १० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या ग्रामसभेत हा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला. (अशाच प्रकारे अन्यत्रच्या ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांनी काश्मिरी बांधवांविषयी ठराव संमत करून काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी जनमताचा रेटा निर्माण करावा. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

वर्ष १९९० पासून काश्मिरमध्ये सहस्रो काश्मिरी हिंदूंची हत्या करण्यात आली, तर लक्षावधी काश्मिरी हिंदूंनी काश्मीरमधून पलायन केले. हे लोक देशात विविध ठिकाणी गेली २ दशकांहून अधिक काळ तंबूमध्ये हालाखीचे जीवन जगत आहेत. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे सरकारने या संदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, असे ठरावात म्हटले आहे. उपसरंपच श्री. माऊली पवळे, श्री. ज्ञानेश्‍वर पवळे, श्री. राहुल पवळे, ग्रामविकास अधिकारी श्री. नवले यांच्यासह उपस्थित १५० हून अधिक ग्रामस्थांनी हा ठराव सर्वानुमते संमत केला.

…. ही तर देशसेवा ! – ग्रामस्थांची भावना

ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही काश्मिरी हिंदूंच्या सोबत आहोत, हे दाखवून देण्याची आणि भारतमातेच्या चरणी देशसेवेचे पुष्प अर्पण करण्याची मोठी संधी आम्हाला मिळाली आहे, अशी भावना व्यक्त करता ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे एक भारत अभियानाला पाठिंबा व्यक्त केला. (असे देशभरातील राष्ट्रप्रेमी ग्रामस्थ संघटित झाले, तर काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन तर होईलच शिवाय भारताकडे आणि हिंदूंकडे वाकड्या नजरेने पहाण्याची कुणाची हिंमत होणार नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *