स्वतःच्या न्यासातील आर्थिक घोटाळ्याविषयी उत्तर नसल्याने मुक्ता दाभोलकर यांचा कांगावा !
पुणे : सनातन संस्था सांगत असलेली सूत्रे तांत्रिक असून धर्मादाय आयुक्त यांनी सांगितलेली प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत. आम्ही वेळोवेळी त्यांनी मागवलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करत आहोत. त्यामुळे त्या करणे, ही मोठी गोष्ट नाही. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही, असे वक्तव्य मुक्ता दाभोलकर यांनी केले. (आर्थिक घोटाळे समोर येत असूनही त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता विवेकवादी मुक्ता दाभोलकरांना वाटत नसली, तरी ज्या समाजाची त्यांनी दिशाभूल आणि फसवणूक केली आहे, त्या समाजाला त्याची आवश्यकता वाटत आहे. अहवालातील सूत्रे केवळ तांत्रिक म्हणून सोडून देण्याजोगी आहेत, तर त्यांतील एकेका सूत्रांची उत्तरे त्यांनी उघडपणे समाजाला द्यावीत. यावरूनच अंनिसमध्ये झालेला आर्थिक घोटाळा दडपण्याची मुक्ता दाभोलकरांची इच्छा आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यापेक्षा सनातनच्या पसार झालेल्या आरोपींवरील कारवाईविषयी बोला, असे त्या पुढे म्हणाल्या. (स्वतःचे ठेवावे झाकून आणि इतरांचे पहावे वाकून या वृत्तीच्या मुक्ता दाभोलकर ! सनातनच्या फरार साधकांविषयी बोलण्यास सांगणार्या मुक्ता दाभोलकर नक्षलवाद्यांशी संबंध असणार्या त्यांच्या संघटनेतील कार्यकर्त्यांविषयी बोलत नाहीत ! त्यांच्यावर काय कारवाई झाली, हे त्यांनी जनतेला सांगावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) येथील शिंदे पुलावर २० ऑक्टोबरला डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनात त्या बोलत होत्या.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भेटीविषयी त्या म्हणाल्या की, आम्ही मुख्यमंत्र्यांना आश्रमात न जाण्याविषयी पत्र दिले होते, तरीही ते तेथे गेले. अशाच प्रकारचे पत्र आम्ही पंतप्रधानांनाही दिले होते; पण ते गेले नाहीत. (पंतप्रधान ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मगुरूंना भेटायला गेले, त्या वेळी अंनिसने असे पत्र का दिले नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात