‘एक भारत अभियान’ चलो कश्मिर च्या निमीत्ताने . . .
आसनगाव (ठाणे) : येथील नॉलेज सिटी महाविद्यालयात (शिवाजीराव जोंधळे महाविद्यालय) ’दहशतवादाचे भिषण सत्य‘ या प्रदर्शनाचे आयोजन हिंदु जनजागृती समीतीच्या वतीने करण्यात आले होते, तसेच कश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविषयीची ‘आणि जग शांत झाले … !’ ची ध्वनिचित्र फितही दाखवण्यात आली. या प्रदर्शनाचा लाभ २ सहस्रहून अधिक विद्यार्थांनी घेतला.
जगातील जिहादी आतंकवादाचे पहिले बळी काश्मिरी पंडित ठरले. १९९० साली त्यांच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांमुळे त्यांना आपल्या मायभूमीतच विस्थापित व्हावे लागले. गेली २६ वर्षे विविध सरकारे येऊनही मुस्लीम तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे काश्मीरच्या स्थितीत काहीही पालट झाला नाही, तसेच काश्मीरमधील हिंदू आपल्या घरी परतू शकला नाही. यामुळेच ही स्थिती पालटण्यासाठी देशभरातील राष्ट्रवादी हिंदू संघटना ‘एक भारत अभियान’च्या अंतर्गत एकत्र आल्या असून, त्यांनी काश्मीरमध्ये हिंदूंच्या सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रयत्न चालू केले आहेत. याचे औचित्य साधुन हिंदु जनजागृती समितीच्यावतीने ’दहशतवादाचे भिषण सत्य‘ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
क्षणचित्रे
१. काही विद्यार्थांनी समितीचे कार्य जाणून घेतले.
२. विद्यार्थांनी ‘आणि जग शांत झाले … !’ ची ध्वनिचित्र फित पाहिल्या नंतर त्यांना परिस्थितीचे गांभिर्य लक्षात आले.
३. ‘शिवाजी महाराजांसारखे कार्य करण्याची आवश्यकता आहे’ असे विचार विद्यार्थांनी, व्यक्त करुन, उस्फुर्तपणे शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या.
४. प्राध्यपकांनी ‘असे कार्यक्रम प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात झाले पाहिजे,’ असे सांगितले.
५. महाविद्यायाचे प्राध्यापक यांनी ‘आणि जग शांत झाले … !’ ची ध्वनिचित्र फित पाहिल्यानंतर उस्फुर्तपणे ‘जाग उठा है हिन्दु फिरसे, भारत स्वर्ग बनायेगा …!’ हे काव्य गायले.