Menu Close

चिनी फटाके, तसेच हिंदु देवता अन् राष्ट्रपुरुष यांची चित्रे असणारे फटाके विकण्यास मज्जाव करणार ! – जीवन सोनवणे, जळगाव महापालिका आयुक्त

diwali_nivedan

जळगाव : यंदा फटाकेविक्रेत्यांना देण्यात येणार्‍या नियमावलीतच चिनी फटाके, तसेच हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असणारे फटाके विकण्यास मज्जाव करण्याचे सूत्रे आम्ही घालू. या गोष्टी निश्‍चितपणे बंद व्हायला हव्यात, असे जळगाव महापालिकेचे आयुक्त श्री. जीवन सोनवणे यांनी हिंदु जनजागृती समितीला सांगितले. समितीच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. मोहन तिवारी, श्री. ओमप्रकाश जोशी, श्री. प्रमोद बारी, श्री. प्रशांत जुवेकर आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.


हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेले, तसेच चिनी फटाके यांची विक्री न करण्याचा विक्रेत्यांचा निर्णय !

नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनाला मिळालेले यश !

नंदुरबार : शहरातील फटाके विक्रेत्यांच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन केल्यानंतर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची, तसेच चीन उत्पादित फटाक्यांची विक्री करणार नाही, असा निर्धार फटाके विक्रेत्यांनी या बैठकीत व्यक्त केला. (राष्ट्रप्रेमी भूमिका घेणार्‍या विक्रेत्यांचे अभिनंदन ! येथील विक्रेत्यांचा आदर्श सर्वांनी घेतला, तर परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने त्यांच्या चित्रांच्या चिंधड्या उडून विटंबना होते आणि धर्मभावनाही दुखावल्या जातात; म्हणून या फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीने अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांना नुकतेच दिले होते.

२. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आणि विषारी असलेल्या अन् भारत सरकारने बंदी घातलेल्या रसायनांचा वापर चिनी फटाक्यांमध्ये केलेला असतो; म्हणून नंदुरबारमध्ये चिनी फटाक्यांच्या विक्रीला बंदी घालावी, तसेच असे फटाके विक्री करतांना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही समितीने केली होती.

३. या सर्व पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी फटाके विक्रेत्यांची बैठक घेतली. त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजीराव गावित, शहर पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी विक्रेत्यांना कायदे आणि नियम यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनीही प्रबोधन केले. बैठकीला ३५ फटाके विक्रेते उपस्थित होते.


देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री न करण्याविषयी फटाके विक्रेत्यांना नोटिसा पाठवू ! – निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे

निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

diwali_nivedan_kolhapur
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांना निवेदन देतांना धर्माभिमानी

कोल्हापूर : फटाक्यांच्या चित्रांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखण्यात यावी आणि चिनी मालाची अवैध विक्री रोखण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ ऑक्टोबर या दिवशी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. संजय शिंदे यांनी आश्‍वासन दिले की, देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये, यासाठी फटाके विक्रेत्यांना नोटिसा पाठवण्यात येतील, तसेच धर्माभिमान्यांनी फटाके विक्रेत्यांकडे देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी त्वरित मला कळवावे. मी संबंधितांवर कारवाई करतो.

या वेळी शिवसेना युवा उपजिल्हाप्रमुख सर्वश्री सागर पाटील, हिंदु एकता आंदोलनाचे संग्राम घोरपडे, राहुल भोई, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, किशोर घाडगे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मधुकर नाझरे, प्रीतम पोवार, ज्ञानेश गावडे, ज्ञानेश्‍वर अस्वले यांसह आदी धर्माभिमानी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *