भाग्यनगर (हैद्राबाद) : येथील अंबरपेट क्षेत्रामध्ये रोज बड्स किड्स वर्ल्ड या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना हिंदु जनजागृती समितीकडून फटाक्यांचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्यासाठी ध्वनिचित्रफीतही (व्हीसीडीही) या वेळी दाखवण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. तेजस्वी व्यंकटपूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील २५५ मुले आणि ८ शिक्षक यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. शाळेच्या प्रमुख सौ. रमादेवी वडवळकर यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान लाभले.
क्षणचित्र
शाळेच्या शिक्षकांसाठी तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म या विषयावर व्याख्यान आयोजित करण्याची सौ. वडवळकर यांनी या वेळी विनंती केली.
चिनी फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून भाग्यनगरच्या जिल्हाधिकार्यांना निवेदन
भाग्यनगर (हैद्राबाद) : दिवाळीच्या काळात होणारे फटाक्यांचे दुष्परिणाम रोखणे, देवतांची चित्रे असणार्या फटाक्यांवर आणि चिनी फटाक्यांवर बंदी घालणे, या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून भाग्यनगरच्या जिल्हाधिकार्यांना नुकतेच देण्यात आले. या वेळी संतश्री पूज्यपाद आसाराम बापू यांच्या संप्रदायातील साधक, हिंदु वाहिनीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. देहली सरकारने चिनी फटाक्यांवर बंदी घातली आहे, तसा निर्णय येथे घ्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात