धनबाद (झारखंड) : धनबाद जिल्ह्याच्या धनसार येथील सिद्धिविनायक सभागृहात मारवाडी महिला समितीच्या वतीने दोन दिवसीय आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यामध्ये आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या स्थानिक समन्वयक कु. निशाली सिंह यांनी जिज्ञासूंना संबोधित केले.
आपण भौतिक वस्तूपासून सुख इच्छितो; परंतु या वस्तू क्षणभंगूर असल्यामुळे कालांतराने त्यापासून आपण दु:खी होतो. ईश्वर चिरस्थायी त्याचप्रमाणे आनंदायक आहे. त्याच्या साधनेने आपण चिरंतन आनंद प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन कु. सिंह यांनी केले.
११० जिज्ञासूंनी या प्रवचनाचा लाभ घेतला. सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन तसेच ग्रंथ यांचे विक्रीकेंद्र लावण्यात आले होते.
क्षणचित्रे :
१. मार्गदर्शन चालू झाल्यानंतर मेळ्यामध्ये फिरत असलेले काही जिज्ञासू स्वत:हून प्रवचनस्थळी आले आणि त्यांनी संपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
२. विविध प्रांतांमधून आलेल्या विक्री केंद्रांवरील लोकांनीही मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात