केरळमधील खुनी कम्युनिस्टांवर केंद्र सरकारने कारवाई करावी !
भाग्यनगर : केरळमध्ये कम्युनिस्टांकडून राजकीय सुडापोटी हत्यासत्र चालू आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस भागय्या यांनी केला. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची ३ दिवसांची वार्षिक परिषद २३ ऑक्टोबरपासून येथे चालू झाली. देशभरात ठिकठिकाणी हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांविषयी या परिषदेत ठराव मांडण्यात येणार आहेत.
भागय्या पुढे म्हणाले की, केरळमध्ये मुख्यमंत्री पिनरयी विजयन् यांच्या नेतृत्वाखाली असहिष्णुता वाढली आहे. माकपचे कार्यकर्ते राजकीय सुडापोटी हिंदूंची हत्या करत आहेत, तसेच या राज्यात संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मालमत्तेची हानी करत आहेत.
दुसरीकडे बंगालमध्ये दुर्गापूजेच्या वेळी जिहाद्यांनी हिंदूंवर आक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तमिळनाडूमध्ये हिंदु संघटनेच्या सदस्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या परिषदेत ठराव मांडण्यात येणार आहे. या बैठकीत देशभरातील विविध प्रांतांतील जवळपास ४०० पदाधिकारी उपस्थित आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात