प्रदूषण करणार्या फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी
फरीदाबाद (हरियाणा) : २३ ऑक्टोबर या दिवशी येथील वल्लभगडमधील सिटी पार्कमध्ये राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. बंगालच्या बीरभूमच्या कांगलापहार गावात नवरात्रोत्सवात दुर्गापूजा उत्सवाला मुसलमानांमुळे अनुमती नाकारण्यात आली. याचा विरोध करण्यासाठी, कोट्यवधी रुपयांची आर्थिक हानी करणार्या आणि प्रदूषण करणार्या फटाक्यांवर बंदी आणणे, तसेच महिलांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी कठोर कायदा बनवण्याची मागणी या आंदोलनाच्या वेळी करण्यात आली. या आंदोलनात गोमानव सेवा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
चिनी फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी
वाराणसी : पाकच्या कलाकारांचा समावेश असणार्या चित्रपटांवर कायमस्वरूपी बंदी घालणे, चिनी फटाक्यांवर तात्काळ प्रतिबंध करणे या मागण्यांसाठी येथील शास्त्रीघाट, वरुणापुलाजवळ राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी, तसेच राष्ट्रप्रेमींनी तीव्र निषेध करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आणि केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री यांना पाठवले. या आंदोलनात इंडिया विथ विझडम, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. तसेच अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता श्री. संजीवन यादव, अधिवक्ता श्री. विजय सेठ आदी मान्यवरही उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात