Menu Close

पाक कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करू नये यासाठी ठाणे येथील चित्रपटगृहांना निवेदन !

thane_pak_kalakar_nivedan
डावीकडून सिनेवंडर चित्रपटगृहाचे व्यवस्थापक श्री. जतीन मल्होत्रा यांना निवेदन देतांना डॉ. आशिष देवळे, श्री. अतुल देव, श्री. देवेंद्र सोरटे

ठाणे : पाकिस्तानने भारताविरुद्ध पुकारलेल्या अघोषित युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात यावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत नौपाडा, ठाणे येथील मल्हार चित्रपटगृह आणि तीन हात नाका, इटर्निटी मॉल मधील सिनेवंडर चित्रपटगृहांच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मल्हार चित्रपटगृहाचे व्यवस्थापक श्री. भगवान दिवाळे या वेळी म्हणाले, सिंगल स्क्रीन असोसिएशनने घेतलेल्या निर्णयानुसार पाक कलाकारांचा समावेश असलेले चित्रपट महाराष्ट्रातील ६०० सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्येे प्रदर्शित करण्यात येणार नाही. सिनेवंडर चित्रपटगृहाचे व्यवस्थापक श्री. जतीन मल्होत्रा यांनी समितीची या संदर्भातील सूत्रे संबंधित अधिकार्‍यांपर्यंत पोचवण्याचे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *