Menu Close

हरियाणामध्ये गोहत्येच्या गुन्ह्यांत ५१३ आरोपींपैकी ४२१ आरोपी मुसलमान !

दादरी (उत्तरप्रदेश) येथील अखलाकच्या मृत्यू प्रकरणात ऊर बडवणारे, गोरक्षकांना विरोध करणारे, कसायांना पाठीशी घालणारे, गोरक्षकांना समाजकंटक म्हणणारे याविषयी काही बोलणार नाहीत, कारण ते निधर्मी आहेत ! – सम्पादक, दैनिक सनातन प्रभात

myanmar_dharmand_gohatyaचंडिगड – हरियाणामध्ये गोहत्या कायद्याच्या अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये ६ पैकी ५ आरोपी मुसलमान असल्याची माहिती समोर येत आहे. हरियाणामधील भाजप सरकारला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्‍वभूमीवर गोहत्या कायद्याच्या संदर्भातील माहिती समोर आली आहे. गेल्या ८ महिन्यांत येथील पोलिसांनी गायींची तस्करी आणि हत्या प्रकरणांतील गुन्ह्यांमध्ये एकूण ५१३ जणांविरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. यात जवळपास ४२१ मुसलमान, ८६ हिंदु आणि उर्वरित शीख नागरिकांचा समावेश आहे. गोवंश संरक्षण आणि गोसंवर्धन अ‍ॅक्ट २०१५ नुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंतची ही आकडेवारी पोलिसांनी एकत्रितपणे मांडली आहे. यातील अधिक प्रकरणे ही गो-तस्करीशी संबंधित असून काही गुन्हे गोहत्या आणि गोमांस विक्रीचे सुद्धा आहेत.

आतापर्यंत एकूण १७० जणांना अटक करण्यात आली आहे. मेवात, हिस्सार, फतेहाबाद, मेहाम, भिवानी, रेवाडी, महेंद्रगड, यमुनानगर आणि पानीपत येथे सर्वाधिक गायींच्या तस्करीची प्रकरणे समोर आली आहेत. गो-तस्कर पोलिसांकडून अटकेची कारवाई टाळण्यासाठी गायींची ने-आण करण्यासाठी हिंदूंचा वापर करतात, असे गोरक्षकांकडून सांगण्यात आले आहे. गायींच्या तस्करीत होणारा आर्थिक लाभ आणि बेरोजगारी यांमुळे काही हिंदू सहभागी होतात, असे हरियाणातील एका गोशाळेच्या अध्यक्षाने सांगितले आहे.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *