Menu Close

पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी कराड येथे चित्रपटगृहांना निवेदन

karad_hjs_nivedan
चित्रपटगृहाचे मालक श्री. शेवाळे (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कराड (जिल्हा सातारा) : पाकिस्तानातील कलाकारांच्या चित्रपटांवर प्रतिबंध घालून ते प्रदर्शित न करून देशभक्तीचा संघटित आविष्कार दाखवण्याविषयीचे निवेदन नुकतेच कराड येथील चित्रपटगृहांना हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी दिले. उरी येथील आक्रमणानंतर संपूर्ण भारतात पाकिस्तानच्या विरोधात जनभावना तीव्र आहेत; परंतु भारतातीलच काही नतद्रष्ट चित्रपट निर्माते पाकिस्तानी कलाकारांना घेऊन गल्लाभरू चित्रपटांची निर्मिती करत आहेत. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास अनुमती देणे म्हणजे भारतीय जवानांच्या बलिदानावर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जखमांवर मीठ चोळणे; नव्हे हा उघडउघड राष्ट्रद्रोह करणे आहे. तरी असे चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या वेळी नटराज चित्रपटगृहाचे मालक श्री. तातोबा शेवाळे आणि व्यवस्थापक श्री. भीमराव गायकवाड यांनी ‘आम्ही पाकिस्तानातील कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित करणार नाही’, असे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोहर जाधव, श्री. मदन सावंत, हिंदु एकताचे श्री. सचिन वालेकर, श्री. राहुल यादव, श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. ओमकार माने, श्री. आकाश ढवळे, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. विपुल काशीद, श्री. लक्ष्मण पवार, श्री.बा.श. पालेकर, श्री. शंतनु सुतार उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *