डोंबिवली : येथील विष्णूनगर पोलीस ठाण्यात, तसेच टिळकनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्री. रमेश यादव यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी धर्माभिमानी श्री. प्रकाश झरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सूर्यकांत साळुंखे आणि सौ. वंदना चौधरी उपस्थित होत्या.
अंबरनाथ येथेही शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोडबोले यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदन
देतांना धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी सौ. शिवानी भोईर आणि समितीच्या अधिवक्त्या सौ. किशोरी कुलकर्णी उपस्थित होत्या. निवेदन दिल्यानंतर चीनच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले. तसेच सनातनचे कार्य म्हणजे चांगलेच असणार, असेही पोलिसांनी सांगितले.
मुंब्रा येथील धर्मशिक्षणवर्गातील मुलांनी फटाके विक्री करणार्या दुकानात जाऊन निवेदन दिले. ठाण्यातही अशा प्रकारचे देण्यात आले.
कळवा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांसाठी दिवाळीनिमित्त व्याख्यान !
कळवा : येथील जानकीनगर परिसरात रणरागिणी शाखेच्या वतीने महिलांसाठी दिवाळीचे आध्यात्मिक महत्त्व, लक्ष्मीपूजनाचे महत्त्व, तसेच फटाके फोडण्याचे दुष्परिणाम, त्यातून होणारी हानी यांविषयीचे मार्गदर्शन समितीच्या प्रवक्त्या सौ. सुनिता पाटील यांनी उपस्थित धर्मभिमानी महिलांना केले. या मार्गदर्शनाचा लाभ ३५ महिलांनी घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात