Menu Close

कर्णावती (अहमदाबाद) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

  • बाजीराव-मस्तानी चित्रपटावर बंदी घाला !
  • नाताळनिमित्त आयोजित तेलंगण शासनाचे कार्यक्रम रहित करा !
राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते

कर्णावती (अहमदाबाद) : संजय लीला भन्साळी निर्मित आगामी बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचे विकृतिकरण होत असल्याचे या चित्रपटाच्या लघुपटावरून दिसून येत आहे.  या चित्रपटावर बंदी घालावी, तसेच धर्मनिरपेक्ष तेलंगण शासनाद्वारे नाताळनिमित्त १९५ चर्चमध्ये कार्यक्रम करणे आणि २ लाख ख्रिस्त्यांना कपड्यांचे वाटप करणे, हे निर्णय जनतेच्या निधीचा अपवापर करणारे आहेत. त्यामुळे तेलंगण शासनाने हे कार्यक्रम रहित करावेत, या मागणीसाठी १२ डिसेंबर या दिवशी कर्णावती येथे हिंदुत्ववाद्यांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भारतीय हिंदू सेनेचे गुजरात प्रदेश अध्यक्ष श्री. सुरेश बारोट यांच्यासह त्यांचे सहकारी, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *