जळगाव येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर
जळगाव : सध्या युवकांमधील शौर्य लोप पावले असल्याने ते कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याचे धाडस करत नाहीत. ही परिस्थिती पालटण्यासाठी युवकांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतःतील शौर्य आणि वीरश्री जागृत करायला हवी. तसेच राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यास सिद्ध व्हायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. येथे आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
शिबिराचा उद्देश स्पष्ट करतांना श्री. श्रेयस पिसोळकर म्हणाले, महिलांवरील अत्याचार, बलात्कार या घटनांत वाढ झाल्याने तरुणींना स्वसंरक्षण प्रशिक्षणाची जास्त आवश्यकता आहे. यानंतर कराटे, लाठी-काठी, नानचाकू यांची प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करवून घेण्यात आली. सतर्कता आणि सज्जता वाढवणारे खेळ खेळण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात