- हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! अशा चोरट्या कर्मचार्यांपेक्षा सेवेकरी भक्त मिळण्यासाठी अशी मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्यासाठी शासनाकडे आग्रह धरा !
- धर्मशिक्षणाच्या अभावामुळे जन्महिंदूंकडून होणारे अक्षम्य अपराध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्थानच्या मंदिरातील देणगीत मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने चोरणार्या दिनकर हनुमंत डोखे या कर्मचार्यास न्यायालयाने ३ वर्षे कारावास आणि १ सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
८ जुलै २०१४ या दिवशी मंदिर परिसरात श्री साईचरणी आलेल्या दानाची मोजणी चालू असतांना दिनकर डोखे यांनी काही सोने चोरले होते. हा प्रकार क्लोज सर्कीट टीव्हीमध्ये चित्रीत झाला होता. त्यानंतर मोजणी करणार्या कर्मचार्यांची संस्थानच्या सुरक्षारक्षकांनी पडताळणी केली असता डोखे यांच्याकडे १ ग्रॅम सोन्याचे नाणे, ३ ग्रॅमचे अन्य दागिने आणि ३६ ग्रॅम चांदीचे दागिने असा सुमारे १२ सहस्र रुपयांचा ऐवज आढळून आला. या प्रकरणी श्री साईबाबा संस्थानने शिर्डी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार प्रविष्ट केली होती आणि डोखे यांना निलंबित केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात