Menu Close

बेंगळुरू येथील रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी ४ धर्मांधांना अटक !

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या धर्मांधांकडून होत असतांना त्याविषयी पुरोगामी आणि निधर्मीवादी कधी तोंड उघडत नाहीत; मात्र एखाद्या धर्मांधाची कोणी हत्या केल्यास लगेच त्यांच्याकडून थयथयाट केला जातो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

rss_rudresh
रुद्रेश, कार्यकर्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

बेंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रुद्रेश यांची १६ ऑक्टोबर या दिवशी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महंमद सादिक, महंमद मुजीबुल्ला, वासिम अहमद आणि इरफान पाशा या चौघा धर्मांधांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एन्.एस्. मेघारीख यांनी दिली.

रुद्रेश हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनात सहभागी होऊन परत येत असतांना ते त्यांंच्या ३ मित्रांशी बोलत रस्त्यावर उभे होते. वासिम याने रुद्रेश यांच्यावर कोयत्याने वार केले आणि तो सादिक याच्याबरोबर पळून गेला. या आक्रमणकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी मुजीबुल्ला आणि इरफान शेजारी उभे होते. या धर्मांधांचा आतंकवादी संघटनांशी संबंध आहे का, हे पोलीस पडताळून पहात आहेत. या हत्येसाठी उत्तरदायी असणार्‍यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ५ विशेष पथके बनवली होती, अशी माहिती मेघारीख यांनी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *